वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच महाराष्ट्र राज्य फुटबॉल बॉडीच्या वतीने आंतर जिल्हा राज्यस्तरीय १४ वर्षातील मुलींच्या स्पर्धा शिरपूर येथे २६ ऑक्टोबर पासून सुरू होत असून या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला असून त्याची घोषणा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी केली.
यावेळी गोदावरी फाउंडेशन च्या सचिव डॉक्टर वर्षा पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या सोबत संघटनेचे कार्याध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे ,सहसचिव भास्कर पाटील व मनोज सुरवाडे, छाया बोरसे, अँड आमिर शेख, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद, तसेच संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड झालेली हिमाली बोरोल व प्रशिक्षक म्हणून निवड झालेले थॉमस यांची उपस्थिती होती.
यावेळी संघ निवड समिती चे सदस्य ला तौसिफ शेख, वसीम रियाज, साबीर खालील, वसीम चांद आदींची उपस्थिती होती,
*लढा व जिंका – वर्षा पाटील*
स्पर्धेमध्ये आत्मतीयतेने खेळून लढा व जिंका तसेच नेहमी सकारात्मक विचार करा असे भावनात्मक आवाहन डॉक्टर वर्षा पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना केले.
*निवड झालेल्या खेळाडू खालील प्रमाणे*
युक्ती राजपूत. कर्णधार ( गोलकीपर) इशा ढाके. ( उप कर्णधार ) एलिना फ्रान्सिस , साक्षी बानायत , सिद्धी ठाकरे , दिव्या बाविस्कर ,
परी रंगलानी , अश्विनी ठाकूर
संस्कृती पाटील ,तीरथा नन्नावरे
युगा पाटील ,धन्यता सोनावणे
दर्शना मोरे , हिमानी भुसारी छायनगी येसे , लावण्या सूर्यवंशी,
पलक जाडीया , नेहा चव्हाण , फाल्गुनी खडके, अवनी पवार ( सेकंड गोलकीपर)